अंदाजे वाचन वेळ : १ मिनिट बरं झालं आमच्या लहानपणी असं काही नव्हतं.आम्ही…मातीत खेळलो,गवतात लोळलो,मैदानात धावलो,डोंगरावर चढलो,नदीत डूंबलो,झऱ्यांखाली न्हालो,पावसात भिजलो,जंगलांत बागडलो,बेभान नाचलो,तुफान धावलो,सायकलीवरून पडलो,चिखलात घसरलो,झाडावर लटकलो,मस्त्यांत रंगलो,खेळांत चिडलो,स्पर्धांत हरलो,भांडणांत जिंकलो,धावतांना धडपडलो,फिरताना हरवलो,अडचणीत सापडलो,कचाट्यातून सुटलो,हमसून रडलो,खळखळून हसलो,आणि असं बरंच काही करून लहानपण जगलो.
Author: srankar
मी चिटोऱ्या केल्या नाहीत
अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे शाळेतली गोष्ट आहे. मधल्या सुट्टीनंतर कसला तरी पिरियड होता. आमचे त्या विषयाचे मास्तर आले नव्हते. इतर मास्तर आणि मास्तरीणी आपल्या वर्गात शिकवीत होते. आणि म्हणून आमच्यावर लक्ष ठेवायला कुणीच नव्हतं. अशी सुवर्णसंधी आमच्या वर्गातल्या पोरं-पोरी दवडणार कशी? झाला दंगा सुरु. नाही म्हणायला दोघं-तिघं जणं शांत होती. मी पण गुपचूप, आपल्या…
डोमकावळा
अंदाजे वाचन वेळ : ९ मिनिटे व्हिलचेअरची चाकं फरशीवरून कच SS कच SS आवाज करत पुढं सरकत होती. खुर्चीवर बसलेल्या माणिकरावच्या लेच्यापेच्या मानेला एका हाताने आधार देत नर्सने दुसऱ्या हाताने काचेच्या दाराला धक्का दिला. दारं उघडली पण व्हिलचेअर उतारापाशी नीट सांभाळती न झाल्याने हळूहळू घरंगळायला लागली. इस्पितळाच्या दरवाज्याजवळच्या पायऱ्यांबाजूच्या रॅम्पच्या उंबरठ्यावर पोचली आणि लगबगीने पळत…
Skinned Alive
Estimated reading time : 11 minutes. Three months ago an accident maimed him. It took him some excruciating efforts to walk toward the balcony of his flat. Even the slightest movement of muscles of his left leg brought a pinching sensation to his leg. His wretched struggle of barely putting one foot after another and…
A Cloudy Day
Estimated reading time : 3 minutes. He was in a jolly mood that day. After a week-long period of gloom, he could finally gather some sunshine for himself that morning. Nobody’s words could hurt him into depression anymore, he reminded himself. He parked his motorcycle at his usual spot. Took out his mobile phone and…
दगड आणि धोंडा
अंदाजे वाचन वेळ : १ मिनिट पूरात दगड्याने दिवस – रात्र काबाडकष्ट करून बांधलेली झोपडी वाहून गेली. त्या झोपडीत त्याच्या बायको, धोंडीनं एक एक रुपया जमवून अडीअडचणीला कामात येतील म्हणून दगड्याच्या नकळत लपवलेली पिशवी सुद्धा वाहून गेली.पूर ओसरणाऱ्या नदीच्या काठी बसून दोघंही स्वतःच्या कमनशिबी आयुष्याला दोष देत बसली होती. होतं नव्हतं सगळं गेलं आणि राब राब…
बेडूक आणि विंचू
अंदाजे वाचन वेळ : १ मिनिट धों धों कोसळणाऱ्या पावसाच्या सरींना चुकवण्याचा केविलवाणा, अपयशी प्रयत्न करत एक विंचू जमिनीवर सरपटत होता. समोर विस्तृत जलाशय. पलीकडे पावसापासून वाचण्यासाठी आडोसा होता खरा पण जलाशय पार पडावा कसा? विंचावाची विवंचना त्याला डंख मारत होती. अनायास काठाशी एक बेडूक आला. ‘डराव… डराव…’ (कसं काय विंचवा?), त्यानं विचारलं.’हिस्स.’ (हाल बेहाल आहे.)…
Holding onto a fistful of peanuts
Estimated reading time: 4 minutes. On a cloudy day, Aakash was sitting in balcony of his flat. It was a lazy Sunday morning. He got up a bit later than he usually did. He made his cup of black coffee, pulled an armchair in the balcony and sat slowly. He once loved the clouds and…
फिजेट स्पिनर
अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे फिजेट स्पिनर म्हणून काही एक खेळणं आहे. बरेच दिवस कुणी न कुणी त्याबद्दल बोलत असायचं आणि मी वेंधळ्यासारखं “बरं बरं”, “हो काय…छान” असं काही बाही बोलून आपलं अज्ञान लपवून ठेवायचं असंच धोरण अवलंबलं होतं . हे प्रकरण नेमकं काय आहे म्हणून गूगल केलं, तेव्हा कळलं की त्यात रॉकेट सायन्स…
डायरी आणि मी
अंदाजे वाचन वेळ : ३ मिनिटे मी सातवी किंवा आठवीत असतानाची गोष्ट आहे. इंग्रजी च्या पुस्तकात ‘ऍन फ्रॅंक ची डायरी’ असं काहीसं शीर्षक असलेला धडा होता. त्यावेळी बालविद्या किंवा नवनीत च्या गाईड्स मिळायच्या. त्यातून इंग्रजीच्या धड्यांची मराठीत भाषांतरं असायची. मी ते भाषांतर आधीच्या उन्हाळ्यातच वाचून काढलं होतं. मला पण वाटलं की आपणही डायरी लिहायची. आज्जी…