सिक्रेट सांता
(अंदाजे वाचन वेळ : १२ मिनिटे)
आकाश ६-७ महिन्यांआधीच एका ऍड एजेन्सीत रुजू झाला होता. आधी दोनेक वर्षांचा अनुभव गाठीशी होता पण कमाई फारशी नव्हती. कुटुंब वाढलं, गरजा वाढल्या आणि कमाईत वाढ व्हायला हवी म्हणून त्याने बऱ्याच ठिकाणच्या मुलाखतींअंती त्याच्या नशिबाने इथे त्याची निवड होऊन इथे रुजू झाला.
आठवडाभर सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० पर्यंत डिझाइन्स बनवता बनवता त्याच्या नाकी नऊ यायचे. पण ह्या कंपनीत किमान चार-पाच वर्षं तरी राहावं असा त्याने रुजू होण्यापासूनच ठरवलं होतं. पहिल्याच वर्षी कंपनीच्या वार्षिक महोत्सवात “बेस्ट अपकमिंग डिझायनर” किंवा “एक्सट्रा माईल अवॉर्ड” मिळवण्यासाठी त्याची सतत धडपड सुरु असायची. मॅनेजर देतील ती कामं रात्री उशिरापर्यंत थांबूनही संपवायची. कामाशी काम ठेवायचं आणि फक्त काम काम आणि कामच करायचं हेच त्याच धोरण होतं. इथे नावलौकिक मिळाला की मॅनेजर मॅडम त्याच्यासाठी नक्कीच “उत्तम ग्राफिक डिझायनर” असा चांगला शेरा देतील.
कोकरू
(अंदाजे वाचन वेळ : १० मिनिटे)
पोस्ट ग्रॅड्युएट असलेली अनघा स्वतःचं शिक्षण संसारगाड्यात भरडेल म्हणून लग्न करायला तयार नव्हती. पण कितीही नाही म्हंटलं तरी मुलीचं लग्न होऊन ती सुखाच्या संसारात वागावी अश्या तिच्या आई-वडिलांच्या इच्छेलाही ती नकार देऊ शकत नव्हती. अनुबंधच्या रूपाने तिला सावरून घेणारा जोडीदार मिळाला. पूढे अथर्वचा जन्मही लौकरच झाला.
जरा कुठे दोघांच्या सहजीवनाला स्थिरता येऊ लागली होती पण पुण्यासारख्या मोठ्या शहरात एकट्या अनुबंधाच्या तुटपुंज्या महिना रु. ३० हजारात किती भागणार? स्वतः पुढाकार घेऊन, अनुबंधच्या साथीने तिने एक छोटासा व्यावसायिक कोर्स शनिवार-रविवारचे क्लासेस लावून पूर्ण केला. शनिवार-रविवार अनुबंधच्या ऑफिसला सुट्टी म्हणून त्याने अथर्वला दोन पूर्ण दिवस सांभाळायचे आणि हिने मन लावून शिकायचं. असं करत करत तिने कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि नोकरीसाठी मुलाखती देणं सुरु केलं. लौकरच तिलाही नोकरी मिळाली खरी पण अथर्वचा सांभाळ कसा होईल या विवंचनेत दोघेही पडले. तीन वर्षाच्या अथर्वला दुसरा कसलाही पर्याय नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून डे-केअर मध्ये ठेवावं लागत होतं.
महुआ
(अंदाजे वाचन वेळ : १२ मिनिटे)
त्याने काहीसं चाचरत दरवाज्याबाजुची बटन दाबली. बोट चटकन मागे घेऊन तो दोन पाऊलं मागे सरला. अंगावरचा मळकट सदरसा काठाला धरून खाली खेचला. चेहऱ्यावरून उजवा हात फिरवला. डोक्यावरच्या चापून-चोपून बनवलेल्या केसांच्या भांगेला हातानेच नीट बसवलं. कसल्याशा इंग्रजी गाण्याच्या सुराचा हलकासा आवाज बाहेर त्याच्या कानात पडला आणि दरवाजा उघडण्याची वाट बघत तो उभा राहिला.
पिपहोलला एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने तिने बघितलं. “बाहेर कुणीतरी ध्यान उभं आहे. तू बोलावलं आहेस का?” तिने नवऱ्याला विचारलं.
दगड आणि धोंडा
पूर ओसरणाऱ्या नदीच्या काठी बसून दोघंही स्वतःच्या कमनशिबी आयुष्याला दोष देत बसली होती. होतं नव्हतं सगळं गेलं आणि राब राब राबून निरक्षर कफल्लांच्या आयुष्यात दारिद्रय ठरलेलं. दोघांनी एकमेकांकडे हताश नजरेने बघितलं आणि जीव देण्याची हिंमत नव्हती म्हणून गावाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. धोंडीचा पाय कशात तरी अडखळला. पडता पडता दगड्याने तिला सावरलं. खाली बघतो तर धोंडीच्या पायाशी एक गाठोडे!
डोमकावळा
(अंदाजे वाचन वेळ : ९ मिनिटे)
व्हिलचेअरची चाकं फरशीवरून कच SS कच SS आवाज करत पुढं सरकत होती. खुर्चीवर बसलेल्या माणिकरावच्या लेच्यापेच्या मानेला एका हाताने आधार देत नर्सने दुसऱ्या हाताने काचेच्या दाराला धक्का दिला. दारं उघडली पण व्हिलचेअर उतारापाशी नीट सांभाळती न झाल्याने हळूहळू घरंगळायला लागली. इस्पितळाच्या दरवाज्याजवळच्या पायऱ्यांबाजूच्या रॅम्पच्या उंबरठ्यावर पोचली आणि लगबगीने पळत व्हिलचेअरचं हॅन्डल नर्सनं कसंबसं पकडलं. ऐन वेळेत हॅन्डल हाती लागलं आणि व्हिलचेअर थांबली म्हणून “हाश्श SS हुश्श SS” करत धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून नर्सनं डोळे बंद केले.
विंचवाचं बिऱ्हाड
(अंदाजे वाचन वेळ : १२ मिनिटे)
स्मशानाच्या फाटकाला दशरथानं थरथरत्या हातानं ढकललं. फाटकाच्या गंजलेल्या सांध्यांनी “कर्रर्रर्र… कच्च… SSS ” आवाज केला. आवारातल्या आडव्यातिडव्या वाढलेल्या बोरीच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांनी “कॉ… ऑ … SSS कॉक कांव…” करत कंठ फोडला. काळ्याकभिन्न पंखांची फडफड करत दोन-तीन कावळे होते तिथेच बसले. त्यांच्या कोकलण्याने तिथली शांतता भंगली होती. अधून मधून येणारी मयतीतली माणसं पत्रावळीत अन्न ठेवायची. त्यानं त्यांची क्षुधा भागायची म्हणून कुणाच्या स्मशानात येण्याची वाट बघत जवळपासच कावळ्यांचा जमाव विसावलेला असायचा. कित्येक दिवसांनी इकडे कुणी फिरकलं होतं.
फक्त मूठभर शेंगांसाठी
ढगाळ वातावरण होतं. आळसावलेल्या रविवारच्या सकाळी आकाश त्याच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसून होता. नेहमीपेक्षा जरा उशिराच जाग आली होती त्याला. ब्लॅक कॉफी घेतली, आरामखुर्ची ओढली आणि तो बसला. कधीकाळी त्याला ढगं आणि येणारा पाऊस फार आवडायचा. आता मात्र हे असलं वातावरण आणते ती खिन्नता! ही काळी ढगं पाऊस कमी आणि उदासपणाच्या भावनेतच जास्त भर घालतात असं त्याला वाटायचं.
बराच वेळ तो तसाच बसून राहिला. त्याची बायको आणि मुल अजूनही झोपूनच होते. शेवटी रविवारच नं! गरम कॉफीचा कप ओठी लावला आणि डोक्यात नोकरी सोडण्याच्या विचारांनी गर्दी करणं सुरु केलं. त्याचं नुकताच तिशीत पदार्पण झालं होतं आणि डोक्यात पांढऱ्या केसांनी उगवणं सुरु केलं होतं. कितीही धडपड केली तरी करिअर मध्ये कुठे काय समोर जाण्याची शक्यता धूसरच दिसत होती.
मुंगी आणि पारवा
(अंदाजे वाचन वेळ : १५ मिनिटे)
शंभूदास शास्त्री पालकवाडी गावातले जुणे बुवा होते. पिढ्यानपिढ्या त्यांचं घराणे पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडे धार्मिक विधी संपन्न करायचे. कालांतराने त्यांचे नातेवाईक इतरत्र स्थायिक झाले आणि शंभूदास पालकवाडीचे एकुलते शास्त्रीबुवा उरले. साठीकडे झुकलेले शास्त्रीबुवा स्वभावे मवाळ आणि पापभिरू! अंगाची अगदी काडी झालेली असली तरी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करून पूजा प्रार्थना आटोपून गावच्या मध्यास असलेल्या शिवाच्या मंदिरात भाविकांची सेवा करण्यात त्यांचा दिवस जायचा. कधी कुणाच्या घरून पूजाविधी वगैरे करण्यासाठी बोलावणं आलं तर तेवढा वेळ मंदिरातून बाहेर पडायचं आणि परत लगबगीने परतायचं हाच शास्त्रीबुवा चा दिनक्रम! त्यात व्यत्यय नाही. उन्ह, पाऊस, हिव कशाचीच कधी तमा नव्हती. धर्म हाच त्यांचा जीव आणि तोच प्राण! पैसा अडका, जमीन जुमला यांपैकी कशाचाच मोह नसला तरी जीवन जगण्यापुरती तरी अर्थार्जन करावे येवढे व्यवहारी नक्कीच होते आणि अविवाहित असल्याने पुढल्या पिढीसाठी काही द्रव्य कमवावे अशीही बाब नव्हती. काळाच्या गरजेनुसार बदल होत गेला तरी मूळचे बुवा होते तसेच ‘देवाने दिधले, तैसेचि!’ राहीले.
डिक्शनरीवाला
(अंदाजे वाचन वेळ : ३० मिनिटे)
तो सहाव्या मजल्यावर पोचला. तो दाराबाहेर उभा होता. पाठीवरची बॅग त्याने उतरवली. दीर्घ श्वास घेतला. शर्ट पॅन्ट खोचली. चेहऱ्यावरुन रुमाल फिरवला आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाची लक्ख झळाळी आल्याचं त्याला जाणवलं. त्याने बेल दाबली. बॅगेतल्या त्या दिवशीच्या टारगेटचं ओझं नेहमी एव्हढं असलं तरी मानसिकदृष्ट्या ते ओझं हलकं वाटत होतं.
ऑफिसमधल्या आज सकाळच्या सेल्स मोटिव्हेशन सेशनमध्ये सगळ्या विक्रेत्या मंडळींना त्यांच्या त्यांच्या सिनिअर्सने चांगलचं चढवलं होतं. “हम होंगे कामयाब!” च्या आशावादी मंत्राने ती सगळी मंडळी भारली होती.
नमस्कार!
(अंदाजे वाचन वेळ : १० मिनिटे)
नमस्कार! पेढा घ्या, सर.” पार्किंग स्पेसच्या एका पिलरला खेटलेली खुर्ची सरकवत तो सिक्युरिटी गार्ड पुढे येत म्हणाला.
आवश्यक असेल तेव्हाच अनोळखी व्यक्तींशी बोलणारा मी त्याच्या आवाजाने तंद्रीतून बाहेर आलो. हा सिक्युरिटी गार्ड अनोळखी नसला तरी चालता-बोलता नमस्कार करणारा असल्याने तोंडओळखीचा होता. तेव्हढ्यापुरतीच त्याचा आणि माझा संबंध. त्याचा हा “नमस्कार” मनापासून की जवळच्या भिंतीला लावलेल्या नियमावलीच्या पालनासाठी? ते मला कधी गम्य झालं नव्हतं.
मुळात आदर नसेल, त्या लायकीचा व्यक्तीच नसेल तर “नमस्कार” करूच नये अश्या विचारांचा मी. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात असताना सिनिअर्स रॅगिंग घ्यायचे तेव्हा “सॅल्यूट” वगैरे करायला लावायचे. सॅल्यूट करण्यासारखं ह्या लोकांनी अचिव्ह काय केलं होतं कुणास ठाऊक? मी मात्र त्यांना नमस्कार बिमस्कार न करताच जायचो आणि कित्येकदा केवळ ह्या कारणासाठीच मी कानफडीतही खाल्ल्या आहेत. पुढे मी सिनिअर झालो आणि मला कुणी जुनिअर सॅल्यूट करायचा किंवा दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा तेव्हा मला स्वतःच्या लायकीची कीव यायची. कॉलेज मध्ये पडलेल्या कित्येक पायंड्यांपैकी हा माझा सर्वांत नावडता.