वडापाव… आमचा स्वस्तातला बर्गर. येता जाता लागणारी छोटीशी भूक भागवणारा हा पदार्थ मुंबई-पुण्याकडे स्ट्रीट फूड म्हणून ठिकठिकाणी मिळतो. तसं बघितलं तर विदर्भातल्या आलूबोन्ड्याचाच हा भाऊबंद. तिकडे आम्ही झणझणीत तर्री सोबत आलूबोंडा खातो तर इकडे एका पावाच्या दोन भागांवर हिरवी-लाल चटणी पसरवून, मधात बटाट्याची पॅटी कोंबून देशी बर्गर म्हणून खातो. तोंडी लावायला तिखट हिरवी मिरची असतेच.
सध्या पुण्यात राहत असल्याने जवळपासच्या नावाजलेल्या वडापावच्या दुकानातून/टपरीवरून आम्ही वडापाव विकत आणून खातो.
आमच्या सौ च्या कृपेने वडापाव आज मात्र घरच्या घरी तयार करून खायला मिळाला.
वडापाव ची रेसिपी, पाककृती माझ्या युट्यूब चॅनल वर उपलब्ध आहे.
लिंक – https://youtu.be/Rs3DHkdyfTk
स्वयंपाक घरातल्या निरनिराळ्या प्रयोगांसाठी, नवीन खाद्यपदार्थ चाखून त्यांच्याबद्दल माझी मतं जाणण्यासाठी मला फेसबुकवर खाऊ बोक्या पेज वर फॉलो करा. माझ्या वेबसाईटला भेट द्या. माझ्या वेबसाईट वर मी लिहिलेल्या भयकथा, जीवनकथा वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत.
तुमची मतं, विचार मला नक्की कळवा. लाईक, कमेंट, शेअर करा. पुढल्या वेळी नवीन कन्टेन्ट घेऊन पुन्हा येईन.