फजिती
सासरी गेलो की पाहुणचार होतो. असाच एकदा सासरी गेलो होतो. पंक्तीत बसलो. वाढणं सुरू झाली. जेवण मस्तंच बनलं होतं. सुग्रास जेवण मिळालं की करणाऱ्या हातांची स्तुती झालीच पाहिजे. “मस्त झालं आहे जेवण. भाजी तर आहाहा.” असं म्हणून थाळीतला एक एक पदार्थ कसा छान, चविष्ट बनला आहे त्याबद्दल मी स्तुती सुरू केली. सगळं झालं. सासरेबुवा म्हणाले, “जावई बाप्पू, तुमच्या “ही” नेच बनवला आहे स्वयंपाक.”
एक म्हातारी
ऑफिस सुटलं. घाई गडबडीने पार्किंग मधून गाडी काढली. साधारण पाऊणे सात वाजले असतील. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या ऑफिसातली मंडळी घरी जाण्याच्या ओढीने निघाली. कॅम्पस मधून बाहेर निघतांना रस्त्याच्या एका कडेवरून दुसरीकडे जाणं म्हणजे एक प्रकारचं दिव्यच! दोन्ही कडून ये-जा करणाऱ्या दुचाक्या-चारचाक्यांची वर्दळ!अश्याच गाड्या थांबल्या असतांना एक हाडकुळी, पोटाचं खप्पड झालेली, गरीब बापडी म्हातारी ‘काही तरी खायला द्या हो, या म्हातारीला!
चहा पुराण : भाग १
उत्तम चहा करणे ही सुद्धा एक कला आहे. कुणाकुणाला चहा तयार करणे नाही जमत. केवळ दुधात चहापत्ती टाकली, चमचाभर साखर टाकली आणि एखाद-दोन उकळ्या आणून कपामध्ये चहा गाळला म्हणजे चहा झाला. असा चहा करणे अथवा पिणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे हो! एखाद्याने आपल्याकडे चहा मागूच नये म्हणून अश्या पद्धतीचा चहा करण्याचा घाट घातला जातो. तेव्हा, चहाच्या चाहत्यांनो सावध असा.
चहा पुराण : भाग २
डायरी आणि मी
मी सातवी किंवा आठवीत असतानाची गोष्ट आहे. इंग्रजी च्या पुस्तकात ‘ऍन फ्रॅंक ची डायरी’ असं काहीसं शीर्षक असलेला धडा होता. त्यावेळी बालविद्या किंवा नवनीत च्या गाईड्स मिळायच्या. त्यातून इंग्रजीच्या धड्यांची मराठीत भाषांतरं असायची. मी ते भाषांतर आधीच्या उन्हाळ्यातच वाचून काढलं होतं. मला पण वाटलं की आपणही डायरी लिहायची.
आज्जी कडून थोडे, आजोबांकडून थोडे, काही पणजीकडून असे थोडे थोडे पैसे जमा करून एक २०० पाणी हार्ड बाऊंड वही विकत घेतली.
फिजेट स्पिनर
फिजेट स्पिनर म्हणून काही एक खेळणं आहे. बरेच दिवस कुणी न कुणी त्याबद्दल बोलत असायचं आणि मी वेंधळ्यासारखं “बरं बरं”, “हो काय…छान” असं काही बाही बोलून आपलं अज्ञान लपवून ठेवायचं असंच धोरण अवलंबलं होतं .
हे प्रकरण नेमकं काय आहे म्हणून गूगल केलं, तेव्हा कळलं की त्यात रॉकेट सायन्स असं काही नाहीये. मध्ये बॉल बेअरिंग असलेलं पॅड आणि त्याला जोडून दोन किंवा तीन छोटे वर्तुलाकार चकत्या. मध्यात पकडून किंवा टेबल वर ठेवून चकत्या फिरवायच्या आणि त्या फिरतांना बघायच्या. असं केल्याने म्हणे स्ट्रेस रिलिव्ह होतो, अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टटीव्हिटी डिसऑर्डर असणाऱ्यांनाही मन एकाग्र करायला मदत होते.
आम्ही… लहानपण जगलो
(अंदाजे वाचन वेळ : १ मिनिट)