मुंग्या आणि कोष
अँड्रोक्लस आणि सिंह
(अंदाजे वाचन वेळ : ९ मिनिटे)
एके काळी विशाल रोमन साम्राज्य संपन्नतेच्या भरात असतांना ही घटना घडली होती. रोमन साम्राज्याचा अंमल युरोप पासून मध्य-पूर्वे कडे आणि उत्तर आफ्रिकेच्या प्रदेशात वाढत चाललेला होता. त्यावेळी मोठं-मोठ्या साम्राज्याखाली छोटी-मोठी सामंतशाही असलेली घराणी रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली फोफावत होती. या सामंतांकडे रोमन सम्राट कधी मधी आपले सरदार अधिकारी धाडीत असे.
अश्याच एका अधिकाऱ्याकडे अँड्रोक्लस नावाचा एक गुलाम होता. त्याच्या मालकाची जी-हुजुरी करत, सांगेल ती कामं करत तो दिवसामागून दिवस काढत होता.
करुणांती
(अंदाजे वाचन वेळ : ७ मिनिटे)
कुण्या एके काळी टुमदार घरं असलेली एक गाव होतं. गावातील मुख्य व्यवसाय शेती! पाण्याची मुबलकता आणि शेतकरी कामसू असल्याने त्यांच्या श्रमांना भरभरून फळ यायचं. शेतकरी, व्यापारी आणि शासन एकमेकांच्या हिताची जोपासना करायची. त्यामुळे संपन्नता म्हंटल की पंचक्रोशीतली बाकीची गावं याच गावाचा आदर्श ठेवायची. बरं, पुरुषमंडळींच्या खांद्यांना खांदा लावून बाईमाणसं सुद्धा सदानकदा काही ना काही कामं करत राहायची. प्रत्येकाच्या घरी गाई-म्हशी आणि कोंबड्या वगैरे. त्यामुळे धनधान्यासोबत दूध-अंडी वर्षभर मिळत राहायची. दिवस उजाडताच शेतकरी शेतावर निघून जायचे ते थेट सूर्य मावळताच घरी परतायचे.