
अंदाजे वाचन वेळ : १ मिनिट
बरं झालं आमच्या लहानपणी असं काही नव्हतं.
आम्ही…
मातीत खेळलो,
गवतात लोळलो,
मैदानात धावलो,
डोंगरावर चढलो,
नदीत डूंबलो,
झऱ्यांखाली न्हालो,
पावसात भिजलो,
जंगलांत बागडलो,
बेभान नाचलो,
तुफान धावलो,
सायकलीवरून पडलो,
चिखलात घसरलो,
झाडावर लटकलो,
मस्त्यांत रंगलो,
खेळांत चिडलो,
स्पर्धांत हरलो,
भांडणांत जिंकलो,
धावतांना धडपडलो,
फिरताना हरवलो,
अडचणीत सापडलो,
कचाट्यातून सुटलो,
हमसून रडलो,
खळखळून हसलो,
आणि असं बरंच काही करून लहानपण जगलो.