लहानपणी नागपंचमी मोठी उत्साहात साजरी करायचो. ती आठवण आणि सहज सुचलं ते लिहून काढलंय. बघा, तुमच्याही काही आठवणी जाग्या होतात काय ते. वाचा, आणि अभिप्राय कळवा. श्रावणातला पहिला सण… नागपंचमी लहानपणी शाळेला सुट्टी असायची. आदल्या सायंकाळी यथेच्छ खेळून रात्री गाढ निजलेला मी ताजातवाना होऊन सकाळी न्हाऊन देवापुढे उदबत्ती लावून प्रार्थना म्हणायचो. बाहेर भूर भूर पाऊस…
Author: srankar
सिक्रेट सांता
(अंदाजे वाचन वेळ : १२ मिनिटे) आकाश ६-७ महिन्यांआधीच एका ऍड एजेन्सीत रुजू झाला होता. आधी दोनेक वर्षांचा अनुभव गाठीशी होता पण कमाई फारशी नव्हती. कुटुंब वाढलं, गरजा वाढल्या आणि कमाईत वाढ व्हायला हवी म्हणून त्याने बऱ्याच ठिकाणच्या मुलाखतींअंती त्याच्या नशिबाने इथे त्याची निवड होऊन इथे रुजू झाला. आठवडाभर सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० पर्यंत…
लोकल
(अंदाजे वाचन वेळ : १५ मिनिटे) ऑफिसमधून वेळेतच निघालो होतो. नेहमीप्रमाणे घाईघाईत पायपीट करत, पायांच्या पोटऱ्या दुखवत स्टेशनवर पोहचलो. गर्दी नेहमीप्रमाणे “अबब!”. अशा गर्दीत मोकळा बाकडा मिळणं दुरापास्तच! स्लो लोकल प्लॅटफॉर्मवर पोचायला फारसा वेळ लागत नाही. पाठोपाठ लोकल्स येत जात राहतात. तसंही अंधेरी ते गोरेगाव फार फार तर १२-१५ मिनिटांच्या अंतरावर. आमच्याकडे अंतर वेळेत मोजतात,…
नमस्कार!
(अंदाजे वाचन वेळ : १० मिनिटे) “नमस्कार! पेढा घ्या, सर.” पार्किंग स्पेसच्या एका पिलरला खेटलेली खुर्ची सरकवत तो सिक्युरिटी गार्ड पुढे येत म्हणाला. आवश्यक असेल तेव्हाच अनोळखी व्यक्तींशी बोलणारा मी त्याच्या आवाजाने तंद्रीतून बाहेर आलो. हा सिक्युरिटी गार्ड अनोळखी नसला तरी चालता-बोलता नमस्कार करणारा असल्याने तोंडओळखीचा होता. तेव्हढ्यापुरतीच त्याचा आणि माझा संबंध. त्याचा हा “नमस्कार”…
वडापाव
वडापाव… आमचा स्वस्तातला बर्गर. येता जाता लागणारी छोटीशी भूक भागवणारा हा पदार्थ मुंबई-पुण्याकडे स्ट्रीट फूड म्हणून ठिकठिकाणी मिळतो. तसं बघितलं तर विदर्भातल्या आलूबोन्ड्याचाच हा भाऊबंद. तिकडे आम्ही झणझणीत तर्री सोबत आलूबोंडा खातो तर इकडे एका पावाच्या दोन भागांवर हिरवी-लाल चटणी पसरवून, मधात बटाट्याची पॅटी कोंबून देशी बर्गर म्हणून खातो. तोंडी लावायला तिखट हिरवी मिरची असतेच….
डिक्शनरीवाला
(अंदाजे वाचन वेळ : ३० मिनिटे) तो सहाव्या मजल्यावर पोचला. तो दाराबाहेर उभा होता. पाठीवरची बॅग त्याने उतरवली. दीर्घ श्वास घेतला. शर्ट पॅन्ट खोचली. चेहऱ्यावरुन रुमाल फिरवला आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाची लक्ख झळाळी आल्याचं त्याला जाणवलं. त्याने बेल दाबली. बॅगेतल्या त्या दिवशीच्या टारगेटचं ओझं नेहमी एव्हढं असलं तरी मानसिकदृष्ट्या ते ओझं हलकं वाटत होतं. ऑफिसमधल्या आज…
भरल्या मिरच्या
भरल्या मिरच्या माझ्या आवडत्या महाराष्ट्रीयन पदार्थांपैकी एक आहे. आपल्याकडे सर्व काही सज्ज असेल तर तयार करण्यास १५ मिनिटे लागतात. साधारण ५० ग्राम भाजलेली शेंगदाणे, ६ ते ७ लसूण पाकळ्या, ३ तिखट मिरच्या, एक चमचा जिरे, एक चमचा मीठ, खाद्य तेल, चिरलेली कोथिंबीर किंवा सांभार आणि कोरलेली भावनगरी मिरची तयार ठेवा. भावनगरी मिरची ही एक प्रकारची…
मुंगी आणि पारवा
(अंदाजे वाचन वेळ : १५ मिनिटे) शंभूदास शास्त्री पालकवाडी गावातले जुणे बुवा होते. पिढ्यानपिढ्या त्यांचं घराणे पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडे धार्मिक विधी संपन्न करायचे. कालांतराने त्यांचे नातेवाईक इतरत्र स्थायिक झाले आणि शंभूदास पालकवाडीचे एकुलते शास्त्रीबुवा उरले. साठीकडे झुकलेले शास्त्रीबुवा स्वभावे मवाळ आणि पापभिरू! अंगाची अगदी काडी झालेली असली तरी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करून पूजा प्रार्थना आटोपून गावच्या मध्यास…
Chijbilai
My childhood memories of this fruit known to many locally as Ilaiti Chinch, Chijbilai, Ingraji Chinch in Marathi, my mother tongue, came calling to me today. It is called as “Seema Chintakaya” in Telugu, “Kodukka Puli” in Tamil, “Seema Hunase” in Kannada. In Hindi, it is called “Jungli Jalebi” English speakers may know it as…
शापित
(अंदाजे वाचन वेळ : ३५ मिनिटे) हरिदासला वेटाळातल्या लोकांनी त्या दिवशी गावभर शोधलं होतं. सायंकाळच्या वेळी शेवटी त्याला पकडून त्याच्या घरासमोरच्या पिंपळाच्या वृक्षाच्या खोडाला दोरखंडांनी बांधून ठेवलं होतं. काहीशा बेशुद्धावस्थेतच त्याने दीपककडे बघितलं आणि कसनुसा दीनवाणा हसला फक्त. त्याच्या डोळ्यांत डोळे टाकून दीपक काहीशा तिरस्काराने त्याच्या बापाकडे बघत होता. असला कसा नीच, घृणास्पद असणारा आपला…